मुंबई : रवींद्र जोशी मेडिकल फाउंडेशन तर्पे रविंद्र जोशी स्मृती दिनानिमत्त महिलांसाठी विशेष आरोगय तपासणी व जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नाना पालकर स्मृती समितीच्या सहकार्याने हे शिबीर २२ ऑगस्ट रेाजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता रविंद्र जोशी मेडिकल पाऊंडेशन सरस्वती अपार्टमेंट अंधेरी येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी मासिक पाळीतील त्रास गर्भाशय व पिशवीचे आजार स्तनातील गाठी व इतर विकार मुलींच्या वयात येतानाचे बदल पाळी जाताना व पाळीनंतरचे बदल प्रसूतीपुर्व व प्रसूतीनंतरची तपासणी याबाबत निवारण व आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमात मा नगरसेविका संध्या सुनिल यादव यांच्यसह पाऊंडेशनचे आणि नाना पालकर स्मृती समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ता उपस्थित असणार आहेत.
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.