पुणे : यशदा, पुणे येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांची महाराष्ट्र शासनाने नुकतीच डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक या पदावर नियुक्ती केली. त्यांच्याकडे संस्थेतील विस्तार व सेवा या पदाच्या विभाग प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे. या विभागामार्फत संस्थेची प्रकाशने, प्रचार -प्रसिद्धी त्याचबरोबर समतादूत प्रकल्प असे कामकाज त्यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यांनी नुकताच बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, डॉ बबन जोगदंड यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. महासंचालक यांच्या हस्ते डॉ जोगदंड यांना "महामानव " हा ग्रंथ तसेच पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत केले.
यावेळी मनेागत व्यक्त करताना महासंचालक सुनिल वारे म्हणाले की डॉ बबन जोगदंड यांनी देशातील नामवंत अशा ’यशदा’ संस्थेमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे. बार्टी संस्थेच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते महत्वपूर्ण काम करतील, असा आशावाद व्यक्त करुन त्यांचे बार्टीत स्वागत केले.
याप्रसंगी निबंधक इंदिरा अस्वार, स्नेहल भोसले, वॄषाली शिंदे, यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचलन रामदास लोखंडे यांनी केले तर आभार सुमेध थोरात यांनी मानले.
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.