कोटाराक्करा येथे लव्ह जिहाद प्रकरणाविरोधात तीव्र आंदोलन हिंदू संघटनांकडून कारवाईची मागणी

    20-Aug-2025   
Total Views |

मुंबई  : अशी माहिती आहे की, रोडुविला येथील त्या तरुणाने एका विद्यार्थिनीला धमकावले आणि प्रेमाच्या आडून तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारवाई करण्याऐवजी पोलिस त्याचे संरक्षण करत असल्याचा आरोप निदर्शकांकडून करण्यात आलाय. आरोपी अनेक वेळा पोलीस ठाण्यात येऊन गेला असतानाही त्यास अटक करण्यात आली नसल्याचे निदर्शकांचे म्हणणे आहे. मोर्चाच्या सुरुवातीस बोलताना हिंदू ऐक्य वेदीचे राज्य सरचिटणीस मंजपारा सुरेश यांनी पोलिसांवर गुन्हेगाराला वाचविण्याचा आरोप केला.

मोर्चा मणिकंदन आल्थारा येथून सुरू होऊन गांधीमुख्कूकडे सरकला, पण पोलीसांनी एसपी कार्यालयाजवळ बॅरिकेड्स उभारून तो अडवला. त्यानंतर तेथेच एक निषेधसभा घेण्यात आली. या सभेचे उद्घाटन महिला ऐक्य वेदीच्या राज्य अध्यक्षा बिंदू मोहन यांनी केले. अध्यक्षस्थानी मंजपारा सुरेश होते. या बैठकीत विहिंपचे प्रादेशिक सचिव सुधाकरण मरूर, हिंदू ऐक्य वेदीचे राज्य सचिव थेक्कडम सुधर्शन, राज्य समिती सदस्य तलवूर गोपालकृष्णन, भाजप पूर्व जिल्हाध्यक्ष राजी प्रसाद, महिला ऐक्य वेदीच्या राज्य सचिव अलीला पोनू आणि हिंदू ऐक्य वेदी तालुकाध्यक्ष डॉ. हरीराम आदी उपस्थित होते.

आपल्या भाषणात बिंदू मोहन यांनी सरकार आणि पोलिसांवर धार्मिक तुष्टीकरण केल्याचा आरोप केला. हिंदू आणि ख्रिश्चन समाजाच्या हिताच्या खर्चावर हे तुष्टीकरण चालते, असे त्यांनी म्हटले. अगदी अधिकृत निवेदनातही पोलिसांना “बळजबरी धर्मांतर” हा शब्द वापरण्याची भीती वाटते, हे त्यांचे पक्षपात दाखवते, असे त्यांनी सांगितले. लव्ह जिहादला कायदेशीर बंदी घालण्याची आणि कोटाराक्करा प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करण्याची त्यांनी मागणी केली आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष राजी प्रसाद म्हणाले की, केरळ आता तरुण महिलांच्या आत्महत्यांच्या संख्येत देशात अव्वल ठरत आहे. प्रेमाच्या आडून होणाऱ्या बळजबरी धर्मांतराच्या प्रयत्नांमुळे, धमक्या, जबरदस्ती आणि छळामुळे हे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. लव्ह जिहादची प्रकरणे सतत उघडकीस येत असूनही, वित्तमंत्र्यासह अनेक नेते त्याचे अस्तित्व नाकारतात, अशी टीका त्यांनी केली. कोटाराक्करा प्रकरणात पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधातील सर्व आंदोलनांत भाजप सोबत उभा राहील, असे त्यांनी आश्वासन दिले.

एसपी कार्यालयाजवळ पोलिसांनी अडवलेल्या या मोर्चाचा शेवट निषेधसभेने झाला, ज्यातून न्याय आणि आरोपीच्या तात्काळ अटकेची मागणी पुन्हा अधोरेखित करण्यात आली.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक