मुंबई : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी युगांडामध्ये भारताचा अभिमान उंचावला आहे. युगांडाच्या पंतप्रधानांशी भेट घेत मानवतेसाठी केलेल्या कार्यांवर, जागतिक प्रेम, शांतता आणि ऐक्यावर आध्यात्मिक चर्चा त्यांनी केली. या दरम्यान मानवतेसाठी केलेल्या कार्यांबद्दल पंतप्रधान रोबिना नब्बान्जा यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा सत्कार ही केला.
युगांडाच्या पंतप्रधानांना जेव्हा बागेश्वर बाबांनी भारतात गरीब मुलींसाठी आयोजित विवाह समारंभ, दररोज हजारो लोकांसाठी चालवली जाणारी अन्नपूर्णा सेवा, गरजू रुग्णांसाठी उभारण्यात येत असलेले कॅन्सर रुग्णालय यांची माहिती दिली तेव्हा त्यांनी त्याचे कौतुक केले. यावेळी बागेश्वर बाबा म्हणाले की या सर्व कार्यांची प्रेरणा त्यांना आपल्या शास्त्रांमधून आणि भारतीय संस्कृतीतून मिळते, ज्यात ‘नर म्हणजेच नारायण’ असे मानून सेवेचा संदेश दिला आहे.
या प्रसंगी त्यांनी युगांडाच्या पंतप्रधानांना बागेश्वर धाम येथे येण्याचे निमंत्रणही देण्यात आले. ते म्हणाले की जागतिक शांततेसाठी भारतीय जीवनपद्धती आणि सनातनचा मार्ग हा सर्वोत्तम आहे. सनातनी माणूस संपूर्ण जगाला आपले कुटुंब मानतो आणि सर्वांच्या कल्याणाची कामना करतो. आपल्याला अशा महान संस्कृतीला समजून घेण्याची आणि स्वीकारण्याची गरज आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक