
मुंबई : (Indigo Fight) समाज माध्यमांवर सध्या इंडिगो विमानातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये बसलेली एक व्यक्ती एका इस्लामिक व्यक्तीच्या कानशिलात लगावताना दिसतेय. या व्हिडिओचा वापर करून काही समाजकंटक समाज माध्यमांवरून दोन गटांत विष परसरू पाहतायत. मात्र मारणारी व्यक्ती ही हिंदू नसल्याचे स्पष्ट झालेय. त्यामुळे समाज माध्यमांतून पसरवल्या जाणाऱ्या अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
इंडिओ विमानात घटलेली घटना निश्चितच दुःखद आहे, मात्र त्याला धार्मिक रंग लावणे चुकीचे आहे. पीडित व्यक्तीचे नाव हुसेन अहमद मजुमदार असे असून तो पॅनिक अटॅकने ग्रस्त होता. त्याला एका हिंदू युवक मारतोय, असा दावा करत काही समाजकंटक त्या घटनेस धार्मिक रंग देऊ पाहतायत. मात्र पीडित व्यक्तीला मारणाऱ्याचे नाव हाफिजुल रहमान असल्याचे समोर आले आहे. त्याला कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याचा खुलासा करण्यात आला आहे.