कल्याण: केडीएमसी, रोटरी क्लब ऑफ सेंट्रल कल्याण आणि अर्पण थॅलेसेमिया व सिकल सेल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने अर्पण रोटरी थॅलेसेमिया सेंटरचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे. या सेंटरमुळे आता रुग्णांची उपचारासाठी ठाणो आणि इतरत्र जाण्यासाठी करावी लागणार धावपळ थांबणार आहे. रुग्णासाठी हे सेंटर संजीवनी ठरणार आहे.
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी थॅलेसेमिया सेंटरमध्ये देण्यात आलेल्या सुविधांची पाहणी करून तेथे असलेल्या रुग्णांशी स्वत: संवाद साधला. या उद्घाटन सोहळ्य़ाला महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, महापालिकेचे उपायुक्त, महापालिका सचिव, महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल, इतर अधिकारी वर्ग, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर उपस्थित होते.
अभिनव गोयल म्हणाले, आतार्पयत आपण महापालिकेमार्फत ही सुविधा नागरिकांना पुरवत नव्हते. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी ठाणो व इतरत्र जावे लागत होते. आता या सेंटरमुळे आपण अशा रुग्णांना चांगल्या सुविधा पुरवू शकतो. आजाराशी संघर्ष करत लढणारे हे रुग्ण आपल्या जीवनास प्रेरणा देतात. या सेंटरमुळे अशा रुग्णांचे कष्ट आपण थोड्या प्रमाणात कमी करू शकतो. हे सेंटर चालवणो ही मोठी जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी आपल्या प्रास्ताविकात थॅलेसेमिया असणा:या रुग्णांना काय अडचणी जाणवतात याची माहिती दिली. हे सेंटर साकारण्यासाठी रोटरी क्लब ऑफ सेंट्रल कल्याणचे प्रेसिडेंट रवींद्र कु:हाडे, संजय भोळे, धनंजय पाटील, अनंत देवरे आणि अर्पण थॅलेसेमिया आणि सिकल सेल सोसायटीच्या डॉ. वर्षा उगावकर, अनिल आडेवार, साक्षी मोरे यांनी विशेष प्रयत्न केले.
थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक आजार आहे. तो पालकांमधून मुलांमध्ये संक्रमित होतो. यावर उपचार म्हणजे नियमित रक्त संक्रमण. हा आजार असलेल्या रुग्णांना दरमहा त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनच्या प्रमाणानुसार रक्त संक्रमण करावे लागते. आता रुक्मीणीबाई रुग्णालयाच्या दुस:या मजल्यावर थॅलेसेमिया केंद्र उभारण्यात आलेले असून त्यामध्ये एकाच वेळी सहा रुग्णांवर उपचार करणो शक्य आहे. सदर ठिकाणी विशेषज्ञ,रक्तपुरवठा व इतर आवश्यक मनुष्यबळ अर्पण रक्तपेढीमरफत उपलब्ध होणार असून थॅलेसेमियाच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहे. त्यासाठी रोटरी क्लब ऑफ सेंट्रल कल्याण मार्फत वेळोवेळी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.