मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची कन्या आणि भाजपच्या खासदार कंगना राणावत यांच्या शिर्डी आणि शनी शिंगणापूर दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या दौऱ्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, विशेषतः अशा वेळी, जेव्हा मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरू असताना शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यावर आपली कोणतीही प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत. त्यावेळी शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत आणि शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तिच्यावर जोरदार टीका केली होती. बीएमसीनेजेंव्हा की तिच्या कार्यालयावर बुलडोझर चालवला होता आणि त्यावेळी ‘तोड दिया’ असं ट्वीट राऊतांनी केलं होतं. त्यावर ‘आज माझं घर तुटलंय, उद्या तुझा घमंड तुटेल,’ असं म्हणत कंगनाने उद्धव ठाकरेंवर पलटवार केला होता.
या पार्श्वभूमीवर, कंगना आणि मनसे प्रमुखांची कन्या एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेषतः जेव्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, तेव्हा ही भेट अधिक महत्त्वाची ठरते.
या सगळ्या घडामोडींवर नेहमीच परखडपणे बोलणारे संजय राऊत आज गप्प का आहेत? त्यांच्या या मौनामागे बदलती राजकीय समीकरणं असू शकतात. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यात संभाव्य युतीची चर्चा सुरू असल्याने, थेट प्रतिक्रिया देऊन या चर्चेत कोणताही अडथळा निर्माण करण्याची त्यांची इच्छा नसावी. कंगना सोबतच्या भेटीमुळे मनसे सोबतच्या संभाव्य युतीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी त्यांना भीती तर वाटत नसावी ना?
एक गोष्ट निश्चित आहे, की या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. येत्या काळात उद्धव ठाकरे यांची भूमिका काय असेल हे पाहणे उत्सुकाचे आहे.
या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचे सध्याचे मौन हे 'आपले ठेवायचे झाकून, दुसऱ्याचे पाहायचे वाकून' या म्हणीला सार्थ ठरवत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, आजपर्यंत त्यांनी नेहमीच दुसऱ्यांच्या राजकीय हालचालींवर टीका केली आहे, पण आज जेव्हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न समोर आहे, तेव्हा ते शांत आहेत. अविनाश देशपांडे,पुणे