ऑपरेशन सिंदूरदरम्यान दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करणाऱ्या फायटर पायलट्सना 'वीर चक्र' प्रदान! कोण आहेत 'हे' नऊ वीर?

    14-Aug-2025   
Total Views |

नवी दिल्ली : (Vir Chakra Awardees) पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान देशासाठी दिलेल्या शौर्यपूर्ण योगदानासाठी भारतीय हवाई दलाच्या नऊ लढाऊ वैमानिकांना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने लष्कारातील तिसरे सर्वोच्च शौर्य पदक वीर चक्र प्रदान करुन सन्मानित करण्यात आले आहे.

वीर चक्राने सन्मानित वैमानिकांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये मुरीदके आणि बहावलपूर येथील दहशतवादी तळांना आणि पाकिस्तानी लष्करी तळांना अचूक लक्ष्य करत आपल्या असामान्य कामगिरीचा परिचय दिला. या नऊ वैमानिकांची नावं घोषित करण्यात आली आहेत. 

हे आहेत नऊ वीर :

1. ग्रुप कॅप्टन रणजित सिंग सिद्धू

2. ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा

3. ग्रुप कॅप्टन अनिमेष पटनी

4. ग्रुप कॅप्टन कुणाल कालरा

5. विंग कमांडर जॉय चंद्रा

6. स्क्वाड्रन लीडर सार्थक कुमार

7. स्क्वाड्रन लीडर सिद्धांत सिंग

8. स्क्वाड्रन लीडर रिझवान मलिक

9. फ्लाइट लेफ्टनंट अर्शवीर सिंग ठाकूर




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\