इन्फ्लुएन्सर संदीपा विर्कला मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक! कोर्टानं सुनावली दोन दिवसांची ED कोठडी

    14-Aug-2025   
Total Views |

नवी दिल्ली : (ED Arrests Influencer Sandeepa Virk) सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर संदीपा विर्कला ईडीने मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात १२ ऑगस्ट रोजी अटक केली आहे. तिच्यावर नकली ब्युटी प्रोडक्ट्सची विक्री करुन लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ईडीने तिला अटक करून कोर्टात हजर केले. कोर्टाच्या आदेशानुसार तिला १४ ऑगस्टपर्यंत दोन दिवसांच्या रिमांडवर पाठवण्यात आले. 

ईडीच्या चौकशीतून संदीपा विर्क हिने खोट्या आश्वासनांद्वारे विर्कने स्थावर मालमत्ता मिळवल्याचे उघड झाले. हायबूकेअर डॉट कॉम या पोर्टलद्वारे ती एफडीए-मान्यताप्राप्त सौंदर्य प्रसाधने विकत असल्याचा दावा करते, मात्र ईडीच्या मतानुसार असे संकेतस्थळ अस्तित्त्वातच नाही. या संकेतस्थळावर युजर्सची नोंदणी नाही. पेमेंट गेटवेच्याही अडचणी आहेत. तसेच त्याचे सोशल मीडियावर अस्तित्व नाही. संकेतस्थळावर दिलेला व्हॉट्सअप नंबरही निष्क्रिय आहे. त्यामुळेच सदरचे संकेतस्थळ मनी लाँडरिंगसाठी तयार केल्याचा आम्हाला संशय आहे, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ईडीने असेही म्हटले की, रिलायन्स ग्रुपचे माजी कार्यकारी अधिकारी अंगाराई नटराजन सेधुरामन यांच्याशी असलेले संदीपा विर्कचे कथित संबंधदेखील चौकशीच्या फेऱ्यात आहेत. नटराजन सेधुरामन यांनी मात्र एका निवेदनाद्वारे संदीपा विर्कशी असलेले संबंध आणि तिच्याशी कोणताही व्यवहार केला नसल्याचे म्हटले आहे.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\