मुंबई : उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या प्राचीन शिव मंदिराबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. सदर शिव मंदिराला मकबऱ्यापासून मुक्त करण्याच्या भावनेने हिंदू संघटनांचे कार्यकर्ते याठिकाणी पोहोचले. त्याचवेळी अल्पसंख्याक समुदाय देखील मोठ्या संख्येने मकबऱ्याकडे जाण्यास निघाला. पोलिसांना याची माहिती मिळताच, त्यांनी मध्यस्ती करत निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण शांत केले व दोन्ही गटांतील लोकांना परत जाण्याचे आवाहन केले.
अशी माहिती आहे की, फतेहपूरच्या सदर तहसीलमध्ये शंकरजी आणि भगवान श्रीकृष्ण यांचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर सुमारे हजार वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. मंदिर संरक्षण संघर्ष समिती आणि भाजप तसेच हिंदू संघटनांनी मंदिरात पूजा करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, हिंदू संघटनांचे कार्यकर्ते पूजा-अर्चनेसाठी पोहोचले देखील. हिंदू संघटनांचा आरोप आहे की मंदिराच्या मूळ स्वरूपात बदल करून त्याला मकबऱ्याचे रूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आजही त्या ठिकाणी कमळ आणि त्रिशूल कोरल्याचे पुरावे सापडतील. यावरून स्पष्ट होते की हे एक प्राचीन मंदिर आहे.
विश्व हिंदू परिषदचे या प्रकरणावर म्हणणे आहे की, फतेहपूर जिल्ह्यातील सदर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भगवान शंकर आणि भगवान श्रीकृष्ण यांचे अतिप्राचीन मंदिर आहे. अराजक तत्वांनी त्याचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला. मंदिराला मकबऱ्याचे रूप देण्याचा प्रयत्न झाला. आमची मागणी आहे की हे एक हिंदू धार्मिक स्थळ आहे, त्यामुळे मकबऱ्याचे स्वरूप नष्ट केले जावे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक