ज्येष्ठ स्वयंसेवक माधव थिटे यांचे निधन

    11-Aug-2025   
Total Views |

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व भारतीय विचार साधना प्रकाशन संस्थेचे संस्थापक सदस्य व पूर्व अध्यक्ष माधव पुरुषोत्तम थिटे तथा शरदराव थिटे (नाना) यांचे १ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. बाल वयातच संघ स्वयंसेवक झालेले नाना थिटे यांनी पुण्याच्या पूर्व भागात संघकार्य रुजवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

सीडीए सदर्न कमांड येथून १९९२ साली निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी त्यांचे जीवन संघ विचाराचे साहित्य प्रकाशित करणाऱ्या भारतीय विचार साधना (भाविसा) या संस्थेच्या प्रगतीसाठी व्यतीत केले. १९७७ सालापासून ते २०१७ पर्यंत, वयाच्या ८५ व्या वर्षापर्यंत ते भाविसामध्ये कार्यरत होते.

थिटे परिवार मूळ वाखरी पंढरपूर येथील असून या परिवारातील २०० सदस्यांच्या "मुरलीधरीय" परिवाराचे ही ते प्रमुख होते. संघ, भाविसा, डिफेन्स अकाउंट्स व समाजातील विविध स्तरातील व क्षेत्रातील स्नेही व विशाल मित्र परिवारातून त्यांच्या निधनानंतर शोक संदेश व भावना व्यक्त केल्या गेल्या. माधव थिटे यांच्या पश्चात बहिण, भाऊ, दोन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक