बांग्लादेशातील मॉब लिंचिंगच्या 'त्या' घटनेचा तीव्र निषेध आंदोलनकर्त्यांनी रांगपूर–दिनाजपूर महामार्ग रोखून धरला

    11-Aug-2025   
Total Views |

मुंबई  : बांग्लादेशच्या रांगपूर येथील सोयर परिसरात एका जमावाने रूपलाल दास व प्रदीप दास या दोन हिंदू पुरुषांची मारहाण करत हत्या केली होती. या प्रकरणाच्या निषेधार्थ रविवारी स्थानिक हिंदू बांधवांनी रांगपूर–दिनाजपूर महामार्ग रोखून धरला. या संदर्भातील एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, आंदोलनकर्ते पीडितांच्या मृतदेहांसह निदर्शने करताना व्हिडिओत दिसत आहेत. साधारण १ तास चाललेच्या निदर्शनानंतर रांगपूर प्रशासनाने २४ तासांत दोषींना अटक करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.

रांगपूर येथील सोयर परिसरात शनिवारी एका जमावाने रूपलाल दास व प्रदीप दास यांना व्हॅन चार असल्याचा आरोप करत अडवले. वास्तविक हे दोघेही रूपलाल यांच्या मुलीच्या विवाहासाठी वर पाहण्यासाठी व्हॅनने घनीरामपूर गावात गेले होते. त्यादरम्यान अलमगीर होसैन आणि मेहदी हसन या दोन व्यक्तींनी रूपलाल दास आणि प्रदीप दास यांच्या व्हॅनमध्ये लहान प्लास्टिकच्या बाटल्या आढळल्याचा दावा केला. त्यापैकी एका बाटलीत असे द्रव आहे, ज्यामुळे ते बेशुद्ध झाले, असे त्यांनी सांगितले. यावरून जमावाने दोघा हिंदू पुरुषांवर व्हॅन चोरल्याचा आरोप लावत बेदम मारहाण केली. काठ्या आणि लोखंडी रॉडने त्यांना इतकी मारहाण केली की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी तीव्र संताप आंदोलकांकडून व्यक्त करण्यात आला होता.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक