कल्याण, शासनाच्या निर्देशानुसार घरोघरी तिरंगा या अभियानांतर्गत महापालिकेमार्फत, महापालिकेच्या शाळांच्या माध्यमातून अनेक नवीनतम उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याच अनुषंगाने महापालिका परिक्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी, जवानांना "आभार पत्रं" लिहिली आहेत.
आपल्या देशातील पोलीस बांधव आणि जवान समाजाला, आपल्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपले काम करतात. सीमेवरचे जवान तर आपल्या देशासाठी प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन शहीद होतात,हौतात्म्य पत्करतात. अशा आपल्या पोलीस बांधव आणि जवानांच्या आपल्या देशाप्रती ,नागरिकांप्रती असलेल्या समर्पणाच्या भावनेसाठी, त्यांच्या शौर्य आणि सेवावृत्तीसाठी महापालिका क्षेत्रातील शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांनी या पोलिसांना, जवानांना धन्यवाद देत भावनेने ओथंबलेली "आभार पत्रं" लिहून आपल्या राष्ट्रभक्तीची ,राष्ट्र प्रेमाची प्रचिती दिली आहे .