मुलांनो व्यसनापासून दूर राहा - रेणुका दीदी सम्राट अशोक विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

    10-Aug-2025   
Total Views |

कल्याण , कल्याण पूर्वेच्या सम्राट अशोक विद्यालयात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय कल्याण शाखेच्या राजयोग शिक्षिका रेणुका दीदी, राणी दीदी आणि शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला.

रेणुका दीदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या आपल्या घरात सर्वांच्या हातात मोबाईल असतो मोबाईलच्या अतिवापरामुळे आपल्या एकाग्रतेवर परिणाम होतो तसंच वेळही वाया जातो. मानसिकतेवर परिणाम होतो. आपले आरोग्य महत्त्वाचे आहे. शरीराला हानिकारक व्यसन कोणतेही असो. आपण सर्वांनी त्यापासून दूर राहणे आवश्यक आहे. वेळ काढून अभ्यासाकडे लक्ष द्या. रक्षाबंधन सारखे कार्यक्रम करून आपल्या परिवारातील ऋणानुबंध वाढवा असेही म्हणाल्या.