डोंबिवली : डोंबिवलीतील वे टू कॉज फाऊंडेशन आणि रायडर्स क्लबमार्फत रक्षाबंधननिमित्त दरवर्षीप्रमाणो यंदा ही एक बंधन 2क्25 ‘‘वीरबन्धनम् (वीरांसोबतचे बंधन)’ हा देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत आहे. ज्याअंतर्गत डोंबिवलीचा सुप्रसिध्द ‘चहावाला’ अशी ओळख असणारे समाजसेवक रोहित आचरेकर हे यंदा तब्बल 35 हजारांहून अधिक राख्या, 937 फुटांचा भव्य तिरंगा आणि 21 ध्वज सीमेवरील लष्कराच्या सैनिकांकडे सुपुर्द करणार आहेत.
रोहित आचरेकर हे रक्षाबंधनानिमित्त गेल्या 19 वर्षापासून सीमारेषेवर जाऊन जवानांच्या मनगटावर राख्या बांधण्याचा सामाजिक उपक्रम राबवत आहेत. ज्याला देशभरातील हजारो बहिणींकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून यंदा प्राप्त झालेल्या 35 हजारांहून अधिक राख्या घेऊन ते स्वत: सीमेवरील सैनिकार्पयत पोहोचवणार आहेत. 35 हजार राख्यापैकी 15 हजार राख्या मी डोंबिवलीकर सामाजिक संस्थेद्वारे डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ आणि इतर प्रमुख शहरातून जमा झाल्या आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या सर्व राख्या रोहित आचरेकर यांच्याकडे नुकत्याच सुपुर्द करण्यात आल्या. मागील दोन वर्षापासून डोंबिवलीकर संस्थेतर्फे रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला सक्रिय पांठिबा देण्यात येत आहे.
रोहित आचरेकर हे तब्बल 937.5 फूटाचा भव्य भारतीय तिरंगा ही घेऊन जाणार असून हा तिरंगा द्रास, लडाख येथील कारगील वॉर मेमोरियल येथे अभिमानाने हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यासोबतच विजय पथासाठी 21 तिरंगे ध्वज ही दिले जाणार असून ही जे शौर्य आणि देशभक्तीचे प्रतीक म्हणून सीमा भागात लावले जातील असे आचरेकर यांनी सांगितले.
संस्थेतर्फे यंदा 15 लाख निधी संकलनाचे उद्दिष्टय ठेवण्यात आले आहे. हा निधी भारतीय सैन्य कल्याण निधी मध्ये जमा होणार आहे. जखमी तसेच शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी वापरला जाणार आहे. आजर्पयत या उपक्रमांतर्गत 2 लाख रूपयांचा निधी संकलित झाल्याचे ही त्यांनी सांगितले.