डोंबिवली : डोंबिवली येथील टिळकनगर कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये शुक्रवारी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या आवारातील लोकमान्य टिळक यांच्या अर्धाकृती पुतळ्याला प्राचार्या डॉ वर्षा परब यांनी माल्यार्पण केली.
यावेळी टिळकनगर कॉमर्स कॉलेज चे सर्व प्राध्यापक व बीकॉम, बीकॉम(बीएम्एस्) तसेच बीकॉम ( बॅफ) ह्या सर्व शाखांतील विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करताना हर्ष जाधव या विद्यार्थ्यांने, तर स्वाधंदी धोडपकर या विद्यार्थिनीने उत्स्फूर्तपणे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे महत्त्व, तसेच लोकमान्यांचे भारतीय स्वातंत्र्यासाठी योगदान यावर विचार व्यक्त केले. तसेच प्राध्यापकांच्या वतीने डॉ. प्राची दामले यांनी लोकमान्य टिळकांचे काही गुणविशेष आणि त्यांचे सद्यकालीन महत्त्व विशद केले. भारतीय स्वातंत्र्यासाठी सर्वस्व पणाला लावलेल्या लोकमान्य टिळकांचं केवळ पुण्यस्मरणच नव्हे, तर आजच्या भारतासाठी युवा पिढीची जबाबदारी विद्यार्थ्यांना समजावी, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.