ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले ठरले 'महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार'!

    08-Jul-2025   
Total Views |

hbp.somnath maharaj has become maharashtra favorite kirtankar



मुंबई :
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सोनी मराठी वाहिनी वरील 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' या लोकप्रिय रिॲलिटी शो च्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. सहा कीर्तन रत्नांमधून ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले विजेते ठरले आहेत. ह.भ.प.सोमनाथ महाराज पाटील, ह.भ.प.प्रमोद महाराज डुकरे, ह.भ.प.हर्षद महाराज भागवत, ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले, ह.भ.प.कल्याणी महाराज मोरे, ह.भ.प.लक्ष्मण महाराज लटपटे हे सहा जण अंतिम फेरीत पोहचले होते. या सगळ्यांच्या सुमधुर कीर्तन सादरीकरणाने सोहळ्याला चांगलीच रंगत आणली.


अंतिम फेरीत पोहोचलेल्या सहा जणांमध्ये चांगलीच चुरस होती. या सर्वांमधून ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले यांनी 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' याच्या पहिल्या पर्वाचा विजेता होण्याचा मान मिळवला आहे. वीणेच्या रूपातल्या चांदीचे आकर्षक सन्मानचिन्ह यावेळी त्यांना देण्यात आले.


विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले म्हणाले, 'हा प्रवास माझ्यासाठी स्वप्नवत आहे. या मंचाने मला आत्मविश्वास दिला. आम्हाला मार्गदर्शन करणारे ह.भ.प. राधाताई सानप आणि ह.भ.प. जगन्नाथ महाराज या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं. सोनी मराठी वाहिनीने हा मंच खुला करुन दिला त्यांचा देखील मी ऋणी आहे.'


अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.