
डोंबिवली : हुतात्मा प्रतिष्ठानच्या "पर्यावरण व संवर्धन" प्रकल्पांतर्गत दिनांक ३० जुलै २०२५ रोजी ओम पब्लिक स्कूल, कल्याण शिळफाटा रोड, डायघर येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी मोगरा, सोनचाफा, जाई, जुई,चमेली, पारिजातक, जास्वंद, अबोली, शमी,हिरवा चाफा, रातराणी, अनंत ही फुलझाडे लावण्यात आली.
गंगाधर पुरंदरे यांच्या विशेष उपस्थितीत हा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी खरबे एज्युकेशन ट्रस्ट चे सर्वेसर्वा प्रभाकर खरबे उपस्थित होते. त्यांनी अनोख्या पद्धतीने आजचा स्वतःचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा केला. त्यांनी पर्यावरण संतुलन व प्राणवायूचे प्रमाण यावर हुतात्मा प्रतिष्ठानचे सदस्यांसोबत चर्चा केली. पर्यावरण तज्ञ ईश्वर पाटील, ओम स्कॅनसेंटरचे सुनिल मोकाशी, नमस्ते शौर्य फाउंडेशनचे विलास सुतावणे यांचे हस्ते वृक्षारोपण व प्रा. लक्ष्मण इंगळे यांचे आयोजन व नियोजन या कार्यक्रमासाठी मोलाचे ठरले.
या प्रसंगी ओम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी, प्राचार्या विजाता सिन्हा, ट्रस्टी आशिष सिन्हा, अनघा समुद्र यांचा सक्रिय सहभाग हुतात्मा प्रतिष्ठानच्या प्रकल्पासाठी वरदान ठरला. ओम पब्लिक स्कूलचेवतीने उपस्थित सदस्यांना सन्मान पत्रक प्रभाकर खरबे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.