डोंबिवलीच्या टिळकनगर शाळेत इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला " आनंददायी शनिवार "

    30-Jul-2025   
Total Views |

डोंबिवली : डोंबिवलीच्या टिळक नगर विद्यामंदिर शाळेत ’आनंददायी शनिवार ’ हा उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांसाठी दि. २६ जुलै ला आनंददायी शनिवार साजरा केला. विद्यार्थ्यांसह शिक्षक ही या उपक्रमात सहभागी झाले होते.

महाराष्ट्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणांनुसार विद्यार्थ्यांना पारंपारिक शैक्षणिक पद्धती ऐवजी प्रेरणादायी शिक्षण, जीवन कौशल्य, विविध आनंददायी आणि रचनात्मक कार्यामध्ये सहभागी करून घेतले गेले. आनंददायी शनिवार साजरा केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना, नेतृत्व गुण विकास, तसेच सर्जनशीलता हे गुण वाढण्यास मदत झाली असे मुख्याध्यापिका मुग्धा साळुंखे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी व ६ वी चे वर्ग शिक्षक पर्यवेक्षक दिगंबर जोगमार्गे, उपमुख्याध्यापक नामदेव चौधरी मुख्याध्यापिका मुग्धा साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा शनिवार विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे अतिशय आनंदात साजरा केला.