नवी दिल्ली : (Amit Shah On Operation Mahadev) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून लष्कराने ठार केले केले आहे. या तीन दहशतवाद्यांची नावे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत जाहीर केली आहेत. सुलेमान, अफगान आणि जिब्रान असे या तीन दहशतवाद्यांची नावे आहेत. हे तीनही दहशतवादी पाकिस्तानमधून आले होते, असेही अमित शाह यांनी सांगितले.
पहलगाम आतंकी हमले के ज़िम्मेदार आतंकवादियों को कल भारतीय सेना ने मार गिराया है। अमित शाह ने कहा कि सुलेमान, जिबरान और अबू हमज़ा मारे गए हैं। सुलेमान पहलगाम आतंकी हमले में शामिल था |
अमित शाह म्हणाले, "बैसरन खोऱ्यात २६ भारतीय पर्यटकांना मारणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा सोमवारी खात्मा करण्यात आला." त्यांनी सांगितले की, "यासाठी ऑपरेशन महादेव चालवण्यात आले होते. या दहशतवाद्यांची नावे सुलेमान, फैजल अफगाण आणि जिब्रान आहेत. सुलेमान हा लष्कराचा कमांडर होता. याचे बरेच पुरावे आहेत. अफगाण आणि जिब्रान हे ए श्रेणीचे दहशतवादी होते. हे तिघेही पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी होते आणि तिघेही मारले गेले.शाह म्हणाले की, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन आरोपींचीही ओळख पटली आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे."
"दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले तेव्हा त्यांच्यासोबत एक अमेरिकन आणि दोन एके-४७ रायफल सापडल्या. काडतुसे देखील सापडली. ती चंदीगडला पाठवण्यात आली. जुळणी केल्यानंतर, पहलगाम हल्ला याच रायफल्सने करण्यात आल्याची पुष्टी झाली. आमच्याकडे पुरावे आहेत, जे मी सभागृहासमोर सादर करेन. आमच्याकडे मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दोघांचे मतदार क्रमांक आहेत. ते पाकिस्तानी दहशतवादी होते. दहशतवाद्यांच्या खिशात सापडलेली चॉकलेट देखील पाकिस्तानात बनवलेली होती.", अशी माहिती अमित शाह यांनी सांगितली.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\