
कल्याण : जनता सहकारी बॅक कर्मचारी संघ, कल्याण यांच्यातर्फे भारतीय मजदूर संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘बाळासाहेब राऊळ स्मृती विद्यार्थी पुरस्कार’ सोहळा मोठय़ा उत्साहात पार पडला.
सहकार मंदिर आग्रा रोड कल्याण येथे शनिवारी हा सोहळा पार पडला. हा कार्यक्रम गेल्या 20 ते 22 वर्षापासून न चुकता दरवर्षी करण्यात येतो. यंदाच्या वर्षी साधारणत: तीस विद्यार्थी, विद्यार्थिनी व सहकारी कर्मचारी यांना पारितोषिक देण्यात आले. गेल्या दहा- बारा वर्षापासून या कार्यक्रमात भारतीय मजदूर संघाचे जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या कार्यकत्याला जिल्हा पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा पुरस्कार परिवहनमधील शिवाजी यशवंतराव यांना देण्यात आला. भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय सरचिटणीस रविंद्र हिमते, अखिल भारतीय संघटनेचे अखिल भारतीय अध्यक्ष दिलीप वेल्हणकर, भारतीय मजदूर संघ अखिल भारतीय सहकारी बॅक प्रभारी विराज टिकेकर, कल्याण जनता सहकारी बॅकेचे अध्यक्ष यशवंत पांगारकर उपस्थित होते. गीत घेऊन प्रास्ताविक कुमार मिस्त्री यांनी केले.
टिकेकर म्हणाले, पंच परिवर्तनातील एक ‘कुटुंब प्रबोधन’ हे आपण बरीच वर्ष करत आहे त्याबद्दल संघटनेचे अभिनंदन केले.
वेल्हणकर यांनी बॅकेच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. कल्याण जनता बॅकेचे अध्यक्ष यशवंत पांगरकर यांनी बॅकेच्या विषयी थोडी माहिती देऊन विद्यार्थ्याना शुभाशीर्वाद दिले. शिवाजी यशवंतराव यांनी त्यांचे मनोगत व पुरस्कार दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
हिमते यांनी सांगितले, भारतीय मजदूर संघ 23 जुलै ला भोपाळ येथे का व कसा स्थापन झाला ते सांगितले. आणि त्याचे देशातील काम तसेच दिल्लीच्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय मजदूर संघाने जगाला एक केले पाहिजे अशा स्वरूपाचा आशीर्वाद , विचार दिला असे सांगितले.
कार्यक्रमाचा समारोप मिलिंद रेडे यांनी केला. विद्या गावडे यांनी आभार मानले. कुमार मिस्त्री यांनी पसायदान म्हटले. या कार्यक्रमाला कल्याण जनताचे माजी उपाध्यक्ष डॉ. रत्नाकर फाटक, नोसबेचे सरचिटणीस शरद जाधव, कोषाध्यक्ष विनोद पाटील उपस्थित होते. राजू ठाणगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सु