कल्याणमध्ये पावसामुळे माती खचल्याने भिंत कोसळून सहा घरांचे नुकसान ; कोणतीही जिवित हानी नाही

    27-Jul-2025   
Total Views |

कल्याण : शहराच्या पूर्व भागातील कचोरे परिसरात एका टेकडीवरील पावसामुळे माती खचल्याने
सहा घरांची भिंत कोसळली. स्थानिक नागरीकांना घटनेची माहिती मिळताच स्वत: घरे जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे. आजूबाजूच्या रहिवासियांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे माती खचल्याने ही घटना घडली आहे.

कल्याण पूर्वेतील कचोरे परिसरातील टेकडीवर वस्ती आहे. या वस्तीत सहा घरे होती. या घरात कोणी वास्तव्याला नव्हते. पावसामुळे माती खचल्याने घराची भिंत कोसळली. कचोरे गावातील नागरीकांनी घराचा आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिक रहिवासियांनी घराबाहेर काढले. नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. ज्या घरांची भिंत कोसळली त्या घरांना जमीनदोस्त करण्याचे काम सुरु केले. ही घटना कळताच टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कदम यांच्यासह महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी धाव घेतली. घटनेची पाहणी करुन त्याठिकाणी योग्य ती उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

महापलिकेच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी सांगितले, पावसाळ्यात आम्ही टेकडीवर राहणाऱ्या नागरीकाना सूचना देतो. ज्या भिंत कोसळली. त्याठीकाणी कोणी राहत नव्हते. स्थानिक नागरीकांनी पुढाकार घेऊन कोसळलेल्या घरांना जमीनदोस्त करण्याचे काम सुरु आहे. गेल्या दोन दिवसात पाऊस पडत आहे. या पावसामुळे माती खचली त्यामुळे घराची भिंत कोसळून ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जिवित हानी झालेली नाही.