‘लव्ह जिहाद’चे बळी पुरुषही!

    26-Jul-2025   
Total Views |

‘लव्ह जिहाद!’ गेली कित्येक वर्षे कर्करोगासारखा पसरत चाललेला हा सामाजिक आजार आता अधिकच बळावला आहे. आजवर धर्मांधांकडून लव्ह जिहादच्या शिकार महिला होत होत्या, आता पुरुषही त्याला बळी पडू लागले आहेत. भारताला इस्लाम करण्याच्या इराद्याने भारलेल्या धर्मांधांनी लव्ह जिहाद नामक विषारी खेळ अधिकच तीव्र केला आहे. आग्रामध्ये घडलेल्या घटना याची साक्ष देतात. उजेडात आलेले हे एकच प्रकरण असले, तरी देशभरात अशी अनेक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘लव्ह जिहाद’च्या या विस्तारत चाललेल्या वास्तवाचा घेतलेला आढावा...

नुकत्याच उघडकीस आलेल्या आग्रा धर्मांतरणाच्या भयंकर घटनेतून सिद्ध होते की, केवळ हिंदू मुली-महिलाच नाहीत, तर हिंदू पुरुषही लव्ह आणि इतर जिहादचे बळी होत आहेत. आग्रा धर्मांतरण षडयंत्रामध्ये, शेकडो हिंदू मुलींचे धर्मांतरण झाले. धर्मांतरण करणार्यांची एक टोळीच असून, त्यांचे ‘गजवा-ए-हिंद’ अर्थात इस्लाममय भारताचे स्वप्न आहे. त्यांनी ’मिशन अस्मिता’च्या नावाखाली, शेकडो हिंदू मुलींचे धर्मांतरण केले. या दहा जणांच्या टोळीतले सहाजण जन्माने हिंदू आणि सध्या धर्मांतरित मुस्लीम आहेत. हे सारेच भयंकर आणि दुःखदही आहे! या लेखामध्ये या घटनेचा संक्षिप्त मागोवा घेऊया.

"तुझ्याशी निकाह केला मात्र, तू धर्मांतरित मुस्लीम आहेस. मी आता खर्या मुस्लीम मुलाबरोबर निकाह करणार,” असे म्हणून, सना बेगम ही मुस्लीम मुलगी मोहम्मद अली म्हणजे पूर्वाश्रमीचा पीयूष पवार याला सोडून गेली. पीयूष साधारण चारचौघांसारखाच दिसणारा तरुण होता. त्याला सुंदर, आकर्षक सना भेटली, तो तिच्या प्रेमामध्ये वेडा झाला. सनाने पियुषला सांगितले की, खरंच प्रेम असेल तर निकाह कर पण, निकाहसाठी तुला मुस्लीम व्हावे लागेल. प्रेमासाठी वाट्टेल करायचे असते, हे आपल्या तरुण-तरुणींच्या डोक्यात आधीच भरवलेले आहेच. त्यामुळे सनासाठी पियुषने इस्लाम स्वीकारला, सुतांही केली. पियुषचा आता मोहम्मद अली झाला. दरम्यान हे सगळे सहन न होऊन, त्याचे कुटुंब राजस्थान सोडून गेले. मोहम्मद एकटाच पडला. त्याने मुस्लीम लोकांमध्ये उठबस वाढवली, हिंदू ओळख पुसली गेली. तो कट्टर मुस्लीम झाला मात्र, याच काळात सना त्याला सोडून गेली. पुढे त्याच गोतावळ्याने, त्याचे लग्न आयशाशी करून दिले. याच मोहम्मद अलीला आग्रा धर्मांतरण गँग षडयंत्रमध्ये पोलिसांनी पकडले आहे.

ज्या गुन्ह्याच्या आरोपाखाली मोहम्मद अली आणि त्याच्या सहकार्यांना अटक झाली; ती घटना आग्रा येथे घडली. पंजाबी कुटुंबातील एका मुलीची, महाविद्यालयात एका काश्मिरी मुस्लीम मुलीशी मैत्री झाली. त्या मुलीने तिला जन्नत नसिब होण्यासाठी इस्लामचा स्वीकार करणे कसे गरजेचे आहे, हे पटवले. तसेच, इस्लाम स्वीकारला तर चांगले, सुरक्षित आयुष्यही मिळेल असेही तिला सांगितले. त्या मुलीने जन्नत आणि चांगल्या आयुष्यासाठी, इस्लाम स्वीकारला. तिची लहान बहीण शाळेत जायची. कोरोना काळात तिचे मोबाईलवर शिक्षण सुरू झाले. मात्र, ती मोबाईलवर खेळ खेळू लागली. खेळात एखाद्याला गाडी खाली चिरडणे किंवा गोळ्या घालून ठार केले की, ती खेळ जिंकायची. हा खेळ खेळता खेळता तिला वाटू लागले की, खरोखरच हातात बंदूक पाहिजे. लहान बहिणीने तिच्या मोठ्या बहिणीला इच्छा सांगितली. धर्मांतरित बहीण, धर्मांतरण गँगच्या संपर्कात होतीच. तिने लगेचच लहान बहिणीची इच्छा त्यांना सांगितली. हे ऐकून त्या लोकांनी सल्ला दिला, "माशाअल्ला! छोट्या बहिणीला इस्लाम शिकवत राहा, ती १८ वर्षांची झाली की तिच्यासोबत पळून ये.” त्या मुलीने छोट्या बहिणीला इस्लामविषयी आकर्षित केले. छोटी बहीण १८ वर्षांची झाली, तेव्हा तिला सोबत घेतले आणि ती धर्मांतरण गँगच्या मदतीने कोलकात्याला आली. सख्ख्या बहिणी हरवल्या म्हणून, कुटुंबाने पोलिसात तक्रार केली. तपासात या दोन बहिणी कोलकात्यामध्ये सापडल्या. त्या दोघीही मुस्लीम झाल्या होत्या. छोट्या बहिणीने तर बंदूक हातात घेऊन, फोटोही काढला होता. या दोघींसोबत एक मुलगी बंधक होती, तिलाही पोलिसांनी सोडवले. पोलिसांच्या सखोल चौकशीत आढळले की, धर्मांतरण करणार्या टोळीने देशातील सात राज्यांमध्ये, धर्मांतराचे जाळे तयार केले आहे. काही वर्षांतच त्यांनी शेकडो मुलींना फसवून गळाला लावले. या गँगमध्ये वरकरणी दहाजण आहेत. आरोपीमध्ये आयशा पूर्वाश्रमीची एसबी कृष्णा, अली हसन पूर्वीचा शेखर राय, अबुर रहमान पूर्वीचा रुपेंद्र सिंह, मोहम्मद इब्राहिम पूर्वीचा ऋतिक बनिक, मुस्तफा पूर्वीचा मनोज, मोहम्मद अली पूर्वीचा पीयूष पवार हे धर्मांतरित मुस्लीम, तर ओसामा, रहमान कुरैशी, अब्बू तालिब जुनैद कुरैशी हे जन्माने मुस्लीमच होते. त्यांचे ‘पीएफआय’ आणि इतर पाकिस्तानी दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. धर्मांतरणासाठी पूर्वाश्रमीचे पाच हिंदू पुरुष आणि एक हिंदू महिला काम करत होते. त्यांनी अर्थातच स्वार्थासाठीच धर्मांतरण केले. पुढे तो स्वार्थ भागवता यावा, म्हणून या लोकांनी हिंदूंच्याच लेकींचे जीवन वेदनादायी नरक बनवले.

आग्रा धर्मांतरण कांडमधील गुन्हेगार असलेल्या धर्मांतरित पुरुषांचा विचार करताना, मुरबाडची घटना आठवते. मुरबाडला ‘लव्ह जिहाद’विरोधी सभा घेत होते, त्यावेळी एक तरुण म्हणाला होता "ताई, आईशपथ सांगतो खरी घटना आहे. हिंदू मुलांची जिंदगी पण नरक बनवली जाते.” त्याने सांगितले, "बाजूला पर्यटनस्थळ असलेल्या तालुक्यात (त्याने नाव सांगितले; पण उगाच त्या तालुक्याची बदनामी नको) गावची पोरटोर शिक्षणासाठी, नोकरीसाठी जात होती. पण, काही वर्षांत लक्षात आले की, त्यातली काही पोरं आजारी पडू लागली, त्यांना एडसची लागण झाली. चांगल्या घरची शिकलेली कष्टाळू मुलं, सुपारीच्या खांडाचेही व्यसन नव्हते. मग हे का झालं? गावातल्या पोरांना काय झाले, म्हणून मी घटनेचा मागोवा घेतला. तर कळले की, त्या तालुक्यात शिकायला, नोकरी करणार्या तरुणांना तिथले काही तरुण सांगायचे, कष्ट करून जवानी वाया घालवताय. हेच वय ऐश करण्याचे आहे. २०० रुपयात २० वर्षांच्या आतल्या मुली मिळतील, महिन्यातून एकदा मजा करायला पाहिजे. त्या तरुणांचे नियंत्रण सुटले. ते देहविक्री करणार्या मुलींकडेे जाऊ लागले. त्या तरुणी रिक्षाने मुंब्रा वगैरे भागातून तिथे यायच्या. प्रत्येक तरुणाला एक एक प्रेयसी मिळाली पण, दोन वर्षांतच ते तरुण आजारी पडू लागले. त्या मुलींना हे कळताच, त्यांनी तिथे येणेच सोडले. तरुण गावी परतले. त्या मुली पूर्वी हिंदूच होत्या पण, त्या ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या होत्या. फसवणारे संघटित होते, त्यांनी मुलींना ड्रग्सचे व्यसन लावले. त्यामुळे या मुली त्यांच्या गुलामच झाल्या. फसवणार्यांनी काही महिने त्यांचे लैंगिक शोषण केले. नंतर या मुलींना वेश्या व्यवसायातही ढकलले. दोन-तीन वर्षांतच या मुलींना एडस झाला, तेव्हा त्या पुरुषांनी या मुलींना एक विशेष काम दिले. नाममात्र पैसे घेऊन, हिंदू पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवायचे. या मुलींना त्या पर्यटनस्थळावर उभे करण्यात आले, दुसरीकडे पर्यटनस्थळी त्यांचे हस्तक होतेच. त्यांनी गावातून शहरात आलेल्या त्या मुलांना बरोबर हेरले. त्यांना या तरुणींकडे जाण्यास प्रवृत्त केले. या मुलींमुळे हे तरुण एडसबाधित झाले. उज्ज्वल आयुष्याची स्वप्न पाहणारे तरुण मृत्यूशय्येवर पोहोचले.” तो तरुण बोलत होता. त्याचे म्हणणे ऐकून संताप आणि दुःख एकत्रच दाटून आले.

असो! आग्रा धर्मांतरण घटना उघडकीस आल्यावर हिंदू पुरुषांचेही धर्मांतरण होते, तेही ‘लव्ह जिहाद’चे बळी होतात, हे समाजासमोर आले आहे. या परिक्षेपात आठवतात ते छत्रपती संभाजी महाराज! औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना आमिष दिले होते की, मुसलमान बनलास तर माझ्या मुलीशी निकाह लावून देईन. बादशहा बनून सुखात राहशील. छत्रपतींनी हालहाल होऊन मृत्यू स्वीकारला; पण इस्लाम स्वीकारला नाही. त्यांचे शौर्य आठवताना त्यांचा जाज्वल्य धर्मामिभान आठवताना वाटते की, घरातल्या वंशाच्या दिव्याने हिंदू धर्मसंस्कृतीची नीतिमत्ता, वैभव शिकवणे गरजेचे आहे. तसेच, त्यांना जगभरात मानतवेला काळिमा फासणारा जिहाद समजावणेही तितकेच गरजेचे आहे, जितके घरातल्या लेकींना!

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.