राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

    26-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली,  दिल्ली येथे काँगे्रसचे भागीदारी न्याय महासम्मेलन सुरू आहे. या संमेलनामध्ये काँग्रेसचे नेते यांनी राहुल गांधींची तुलना थेट महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली आहे. इतर मागासवर्गिय समाजाने राहुल गांधी यांचे एकावे त्यांना पाठिंबा द्यावा. मागासवर्बिय समाजाने तसे केले तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील असे उदित राज म्हणाले.इतर मागासवर्गिय समाजाला राहुल गांधीच्या समर्थनासाठी आवाहन करताना उदित राज यांनी राहुल गांधींना दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून सिद्ध होतील हे म्हंटले. त्यामुळे समाजात रोष पसरला आहे.

बाबासाहेबांची तुलना कुणाशीही करणे म्हणजे मुर्खपणा

इतर मागासवर्गिय समाजाने राहुल गांधींना समर्थन दिले, त्यांचे म्हणणे एकले तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील असे काँग्रेस नेते उदित राज म्हणाले. उदित राज यांचे विधान अत्यंत दुखदायक आणि संतापजनक आहे. कारण बाबासाहेबांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. राहु गांधी हे दुसरे आंबेडकर सिद्ध होतील म्हणणे म्हणजे शुदध मुर्खपणा आहे. आमचे एकच साहेब आहेत ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

आ. विजय (भाई) गिरकर

उदित राज यांचे मानसिक संतुलन बिघडले का?

बसपामध्ये असतानाउदित राज उठता बसता बाबासाहबाचे नाव घेत होते. सत्ता मिळावी म्हणून भाजपमध्ये गेले तीथे मंत्रीपद मिळाल नाही मग उदित राज केाँ्रेसमध्ये गेले. आता काँग्रेसमध्ये गेल्यावर उदित राजला राहुल गांधीमध्ये आमचे बाबासहेब आंबेडकर दिसायला लागले का? यावरून असे वाटते की उदित राज यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. नाहीतर विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांशी राहुल गांधीची तुलना केली नसती

शरद कांबळे,अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा मुंबई भाजप

निषेध करावा तीतका थोडा

डॉ. बाबासाहेबांना काँग्रेसने जिवंतपणीही त्रास दिला. आता काँग्रेसचे नेते उदित राज आमच्या महामानव डॉ. बाबासाहेबांची तुलना राहुल गांधीशी करत आहेत. राहुल गांधी कुठे आणि आमचे डॉ. बाबासाहेब कुठे? काँग्रेसचा,उदित राजचा निषेध! त्याचबरोबर राहुल गांधींचाही निषेध. कारण त्यांच्या पक्षातील उदित राज त्यांची तुलना डॉ बाबासाहेब आंबेडकरांसोबत करत असताना राहुल गांधी गप्प राहिले. निषेध!

योजना ठोकळे,जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चा भाजपा, इशान्य मुंबई

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.