सांगलीत कंत्राटदार हर्षल पाटील यांचं टोकाचं पाऊल! शासकीय कामाचे पैसे थकवल्याचा आरोप
24-Jul-2025
Total Views |
मुंबई : शासकीय कामाचे पैसे थकल्याने सांगलीतील कंत्राटदार हर्षल पाटील यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामांचे पैसे न मिळाल्याने त्यांनी आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदुळवाडीत राहणारे हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत काही ठिकाणी शासकीय कामे केली होती. त्याबदल्यात शासनाकडून १ कोटी ४० लाख रुपये मिळणे अपेक्षित होते. परंतू, कामाचे थकित पैसे मिळत नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच त्यांनी स्वत:च्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज काढल्याचीही माहिती आहे. जल जीवन मिशन योजनेचे काम केल्यानंतरही त्यांना १ कोटी ४० लाख रुपयांचे बिल न मिळाल्याने त्यांनी शेतात जाऊ गळफास घेत टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर राज्यभरात संतापाचे वातावरण असून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.