कल्याण : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात बुधवारी त्यांच्या प्रतिमेस महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या समयी उपस्थित मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त संजय जाधव, महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ, जयवंत विश्वास, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सुरक्षा अधिकारी भरत बुळे, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार, सहा.माहिती व जनसंपर्क अधिकारी सुमित बोयत तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी देखील लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.
कल्याण (प) येथील टिळक चौकातील, लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास उपआयुक्त प्रसाद बोरकर व संजय जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
डोंबिवली (पू) पारसमणी चौकातील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास देखील सहा.आयुक्त हेमा मुंबरकर व संजयकुमार कुमावत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या समयी इतर कर्मचारी वर्गाने देखील लोकमान्य टिळक यांच्या पुतळयास पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.