उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

Total Views |

मुंबई, मध्य रेल्वेच्या सीएसएमटी आणि विद्याविहार दरम्यान सकाळी १०:५५ ते ३:५५ पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक राहील. हार्बर रेल्वेच्या सीएसएमटी-चुनाभट्टी आणि वांद्रे डाऊन मार्गावर सकाळी ११:४० ते दुपारी ४:४० आणि अप हार्बर मार्गावर सकाळी ११:१० ते संध्याकाळी ४:१० पर्यंत ब्लॉक राहणार आहे.

सीएसएमटी येथून सकाळी १०:४८ वाजल्यापासून ३:४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या ट्रेन, सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील. त्यानंतर विद्याविहार स्थानकापासून पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर स्थानक येथून सकाळी १०:१९ वाजल्यापासून ३:५२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या लोकल गाड्यांही अशाच पद्धतीने अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्गावर पनवेल आणि कुर्ला दरम्यान विशेष ट्रेन


सीएसएमटी येथून वाशी / बेलापूर / पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील ट्रेन सकाळी ११:१६ ते सायंकाळी ४:४७ पर्यंत, त्याचप्रमाणे वांद्रे / गोरेगावला जाणाऱ्या सेवा सकाळी १०:४८ ते संध्याकाळी ४:४३ पर्यंत रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष ट्रेन चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवासी ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गाने प्रवास करू शकतात.

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली आणि गोरेगाव दरम्यान ब्लॉक


पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली आणि गोरेगाव दरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान अप डाऊन स्लो लाईनवर जम्बो ब्लॉक आहे. या काळात गोरेगाव व बोरीवली दरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालविल्या जातील. अंधेरी, बोरीवलीच्या काही लोकल गोरेगावपर्यंत हार्बर मार्गावर चालविल्या जातील. बोरीवली येथील १, २, ३ आणि ४ प्लॅटफॉर्मवरून एकही लोकल सुटणार नाही.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121