उद्धव ठाकरे असेच बोलत राहा, आपोआप...! केशव उपाध्येंची सडकून टीका

    19-Jul-2025
Total Views |


मुंबई : उद्धव ठाकरे असेच बोलत राहा. आपोआप पितळ उघड पडेल, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी नुकत्याच सामनाला दिलेल्या मुलाखतीचा एक भाग प्रदर्शित झाला आहे. यावरून त्यांनी निशाणा साधला.

केशव उपाध्ये म्हणाले की, "उद्धवराव आज तुम्ही सामना ऑनलाईनच्या मुलाखतीत जी टीका टिप्पणी केली ती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असा प्रकार आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात यश मिळाले त्यावेळी निवडणूक आयोगाबद्दल आणि ईव्हीएमबद्दल तुमची तक्रार नव्हती. विधानसभेला अपयश आल्यावर मात्र बॅलट पेपरवर मतदानाची मागणी करू लागलात."

संपूर्ण मुलाखत विरोधाभासाने भरलेली!

"निवडणूक आयोग कदाचित आमचं निवडणूक चिन्ह दुसऱ्याला देऊ शकतो पण शिवसेना हे नाव दुसऱ्याला देऊ शकत नाही, असे आपण म्हटले आहे. संपूर्ण मुलाखत अशा विरोधाभासाने भरलेली आहे. पण तरीही तुमच्या मुलाखतीमधील काही कबुलीची वक्तव्ये आवडली. मी कोणी नाही. मी शुन्य आहे. उद्धव ठाकरे याला अर्थ नाही. लोकसभेच्या वेळी आपल्याला जिंकायचं आहे हे आपलेपण होतं, विधानसभेला मला जिंकायचंय हा आपल्यात जो मीपणा आला तेव्हा पराभव झाला. उद्धव ठाकरे असेच बोलत राहा. आपोआप पितळ उघड पडेल," असे केशव उपाध्ये म्हणाले.