मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे महारक्तदान शिबिरांचे आयोजन - पक्षाच्या सर्व मंडलांमध्ये मुख्यमंत्र्यांना रक्तदानाच्या माध्यमातून शुभेच्छा देणार
मुंबई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी दि. २२ जुलै रोजी प्रदेश भाजप तर्फे राज्यभरात महारक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली. पक्षाच्या संघटना रचनेतील सर्व मंडलांमध्ये ही शिबिरे होतील. या निमित्ताने राज्यभर विक्रमी रक्तदान नोंदवून प्रदेश भाजपातर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात येणार आहेत. भाजपा परिवारातील सर्वांनी या महारक्तदान शिबीरात सहभागी व्हावे असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.
दि. १९ जुलैपर्यंत प्रत्येक रक्तदात्याचा फॉर्म भरून घ्यायचा असून प्रत्येक मंडलात किमान १०० रक्तदात्यांचे लक्ष्य जिल्हाध्यक्षांनी पूर्ण करायचे आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.