इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर होणार - प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर; मंत्री छगन भुजबळ यांची विधानसभेत माहिती

    18-Jul-2025   
Total Views |

मुंबई, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. या मागणीनुसार, राज्य सरकारने ‘ईश्वरपूर’ हे नाव निश्चित केले असून, हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यास इस्लामपूरचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ असे करण्यात येईल, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.

“हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने, प्रस्ताव शिफारशीसह केंद्राकडे सादर करण्यात आला आहे. मान्यता मिळाल्यानंतर ‘ईश्वरपूर’ हे नाव लागू करण्यात येईल”, असे भुजबळ यांनी निवेदनाद्वारे सांगितले.


सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.