सातारा : पोलीस खात्यात नोकरी मिळवून देतो तसेच तलाठी पदावर नोकरी मिळवून देतो असे सांगून दोन तरूणींची फसवणूक केल्याची घटना उघडकिस आली आहे. आरोपी सागर सुखदेव जाधव याने दोन्ही तरुणींची ३० लाख ५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी २९ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून सागर सुखदेव जाधव याच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. त्याने अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.