महाराष्ट्रातील १२ अधिकारी झाले 'आयएएस'

    14-Jul-2025   
Total Views |


मुंबई : महाराष्ट्रातील १२ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) बढती मिळाली आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. ही बढती २०२४ मधील रिक्त जागांसाठी देण्यात आली आहे.


निवड झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये विजयसिंग देशमुख, विजय भाकरे, त्रिगुण कुलकर्णी, गजानन पाटील, महेश पाटील, पंकज डोरे, मधुसूदन मनोलकर, आशा पठाण, राजलक्ष्मी शहा, सोनाली मुले आणि प्रतिभा इंगळे यांचा समावेश आहे.


महसूलमंत्री चंद्रेशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे अभिनंदन करत सांगितले, की "महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी, यासाठी यासर्व अधिकाऱ्यांना सेवेची नवी महत्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे.


महसूल विभाग हा महाराष्ट्राचा प्रशासकीय कणा आहे; म्हणून या अधिकाऱ्यांनी आता आपली संपूर्ण क्षमता महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयोगी आणावी अशी सदिच्छा व्यक्त करतो".


सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.