ज्येष्ठ गायक अरविंद पिळगांवकर यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या विशेष पुस्तकाचे प्रकाशन!

    13-Jul-2025   
Total Views |

मुंबई, मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते कै. अरविंद पिळगांवकर यांच्या आठवणींचा उजाळा देणाऱ्या 'कोsहम, सोsहम' या विशेष पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ जुलै रोजी, बालगंधर्वांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त, प्रभादेवी इथल्या पु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी लघु नाट्यगृहात सायंकाळी ७:१५ वाजता पुस्तक प्रकाशानाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

निवेदिका, ग्रंथपाल, तपस्या नेवे यांनी संपादित केलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. सदर कार्यक्रमाला ज्येष्ठ गायक अजितकुमार कडकडे, ज्येष्ठ अभिनेत्री पद्मश्री नयना आपटे-जोशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी या प्रकाशन समारंभाला सर्व रसिक श्रोत्यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन दिनेश पिळगावकर व आकाश भडसावडे यांनी केले आहे.





मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.