केडीएमसी तर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी अभिवादन !

    26-Jun-2025   
Total Views |

कल्याण
: राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त गुरुवारी महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे उपआयुक्त संजय जाधव, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहा.आयुक्त चंद्रकांत जगताप, सुरक्षा अधिकारी भरत बुळे तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी देखील राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.