वारी मार्गावरील गावांमध्ये मद्य-मांस विक्री पूर्णतः बंद! मुख्यमंत्र्यांचे आदेश; आचार्य तुषार भोसलेंच्या मागणीला यश
22-Jun-2025
Total Views |
मुंबई : वारीच्या पवित्रतेसाठी आणि भक्तिमय वातावरण अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारी मार्गावरील गावांमध्ये मद्य-मांस विक्री पूर्णतः बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी याबाबतची मागणी केली असून आता त्या मागणीला यश आले आहे.
जय जय राम कृष्ण हरी! 🚩
वारीच्या पवित्रतेसाठी आणि भक्तिमय वातावरण अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय.
📍वारी मार्गावरील गावांमध्ये आजपासून मद्य-मांस विक्री पूर्णतः बंद!
आचार्य तुषार भोसले यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. ज्या मार्गाने पालखी जाणार असेल त्या वाटेवरील गावात किंवा शहरात संपूर्ण दिवसभर मद्य आणि मांस विक्री बंद ठेवण्यात यावी. पंढरपूर परिक्षेत्रात यात्रा कालावधीत मद्य आणि मांसाहारी पदार्थ विक्रीला बंदी ठेवण्यात यावी. तसेच पंढरपूर परिसरात यात्रा काळात अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या (व्हीआयपी) वाहनांच्या ताफ्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी आचार्य तुषार भोसले यांनी केली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली असून प्रशासनाला अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता वारी मार्गावरील गावांमध्ये आजपासून मद्य-मांस विक्री पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. तसेच पंढरपूर परिसरात वारी काळात मद्य-मांस विक्रीला बंदी, आणि व्हीआयपी वाहनांना नो एंट्री असणार आहे.