डोंबिवली, भारतीय जनता पक्षाचे डोंबिवली पश्चिम माजी मंडल अध्यक्ष समीर चिटणीस यांच्या वतीने उद्या सोमवार दि. २३ जून ते बुधवार दि. २५ जून या कालावधीत आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवली पश्चिमेकडील अंबिका नगर भागातील चिटणीस यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर चालणार आहे.
या ठिकाणी नवीन आधार कार्ड नोंदणी, निवासी पत्त्यामध्ये बदल, नावात बदल आणि जन्म तारीख बदल आदी कामे करून देण्यात येणार आहेत. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन समीर चिटणीस यांनी केले आहे.