एअर इंडियाच्या विमानात बिघाड! प्रवासी कोलकात्यात उतरले; काय घडलं?

    17-Jun-2025
Total Views |



मुंबई : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण देश हादरलेला असताना आता एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड झाल्याची माहिती पुढे आली आहे. सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे.

मंगळवार, १७ जून रोजी पहाटे सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI180 मध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. कोलकातामध्ये थांबा घेताना हा तांत्रिक बिघाड झाल्यानंतर प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले. या विमानाने रात्री १२.४५ वाजता नियोजित वेळेत कोलकात्यात लँडिंग केले होते. परंतू, त्याचवेळी विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे सकाळी ५.२० वाजता प्रवाशांना विमानातून उतरावे लागले. तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणाला विलंब झाला.


अहमदाबादमध्ये काय घडलं?

अलीकडेच अहमदाबादहून लंडलना निघालेले एअर इंडियाचे AI-171 विमान उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांत एका मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळले. या दुर्घटनेत तब्बल २७४ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या विमान सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.