मुंबई : विशाल बजेटचा पॅन-इंडिया चित्रपट 'कणप्पा'चा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शनिवारी प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरमध्ये बॉलिवूड स्टार अक्षय कुमार भगवान शंकराच्या भूमिकेत झळकतो आहे, तर प्रभास रुद्राच्या रूपात दिसतो. ट्रेलर पाहताच सोशल मीडियावर अक्षयच्या या दिव्य अवतारावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे.
भगवान शंकराच्या भूमिकेत अक्षय कुमार
ट्रेलर शेअर करत अक्षयने हिंदीत लिहिलं, ''एका महान भक्तीची, धैर्य आणि त्यागाची अमर कथा… एक असा प्रवास जो तुमच्या आत्म्यालाही स्पर्श करून जाईल. पाहा #Kannappa चा ट्रेलर. हर हर महादेव, हर घर महादेव!'' आणि काही क्षणांतच इंटरनेटवर ट्रेलरने धुमाकूळ घातला.
अक्षयच्या चाहत्यांकडून भरभरून प्रतिक्रिया
ट्रेलरनंतर ट्विटर वर अक्षयच्या चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एका युजरने लिहिलं, “खिलाडी महादेवच्या रूपात आणि रेबेल स्टार प्रभास रुद्राच्या भूमिकेत अप्रतिम संयोजन!”
दुसऱ्याने म्हटलं, ''#OMG2 नंतर आता #KannappaTrailer मध्ये देखील फक्त #AkshayKumarच भगवान शंकराची भूमिका समर्थपणे उभारू शकतो. इतकं प्रभावी सादरीकरण. @iVishnuManchu यांचे आभार, त्यांनी अक्षयला असं रूप दिलं.''
एक ट्विट असं होतं, ''सुपरस्टार #AkshayKumar च्या इतक्या प्रभावी रुपात कोणीच शंकराची भूमिका साकारू शकत नाही! त्यांच्या डोळ्यातली ती ताकद, चेहऱ्यावरचं ते शांत स्मित… साक्षात महादेव दिसतो आहे.''
'कणप्पा' बद्दल अधिक माहिती
'कणप्पा' हा चित्रपट भगवान शंकराचे महान भक्त कणप्पा यांच्या जीवनावर आधारित आहे. या पौराणिक आणि भावनिक कथानकात विष्णु मांचू कणप्पाच्या भूमिकेत असून प्रभास ‘नंदीश्वरुडू’च्या भूमिकेत झळकतो. चित्रपटाचं दिग्दर्शन मुकेश कुमार सिंह यांनी केलं आहे.
या भव्य चित्रपटात अक्षय कुमारसोबत मोहनलाल, प्रीती मुकुंदन, काजल अग्रवाल, नयनतारा आणि ब्रह्मानंदम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'कणप्पा' २७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.