स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाची कोकण आयुक्त कार्यालयात बैठक

    07-May-2025
Total Views | 11

Self-Redevelopment Study Group meets at Konkan Commissioner Office
 
मुंबई : ( Self-Redevelopment Study Group meets at Konkan Commissioner Office ) राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांचा अभ्यासगट गठीत करण्यात आला आहे.
 
नुकतीच या अभ्यासगटाची पहिली बैठक वांद्रे येथे पार पडली होती. आता उद्या गुरुवार, ०८ मे रोजी दुपारी ३ वाजता या अभ्यासगटाची दुसरी बैठक सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे.
 
या बैठकीत ठाणे, नवी मुंबई, पनवेल, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मीरा-भाईंदर महानगरपालिकांनी १३ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयातील विविध मुद्द्यांच्या केलेल्या पूर्ततेबाबतचा आढावा घेतला जाणार आहे.
 
या बैठकीला अभ्यास गटाचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्यासह विधान परिषद सदस्य आ. निरंजन डावखरे, नवी मुंबईचे आमदार प्रशांत ठाकूर, वसई (पालघर) च्या आमदार स्नेहा दुबे, ठाणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे अध्यक्ष, नवीमुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे अध्यक्ष, नगरपालिका-महापालिकांचे आयुक्त बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121