केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले अमेरिका दौऱ्यावर

    31-May-2025
Total Views |
Ramdas Athawale on America tour
मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले येत्या सोमवार दि.2 जून रोजी अमेरिका दौऱ्यावर रवाना होणार आहे दि.2 जून ते 11 जून पर्यंत 9 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर ना.रामदास आठवले सोमवारी पहाटे 2 वाजता रवाना होणार आहेत.

अमेरिकेत आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी ना.रामदास आठवले यांना निमंत्रित करण्यात आले आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात दि.2 जून रोजी आंतरराष्ट्रीय इंडी फिल्म फेस्टीव्हल च्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ना रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर मध्ये विविध कार्यक्रमांना अमेरिकेतील पत्रकार विचारवंत उद्योजक आणि अनिवासी भारतीयांची भेट ना.रामदास आठवले घेणार आहेत.त्यानंतर दि.11 जून रोजी ना.रामदास आठवले भारतात परतणार आहेत अशी माहिती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.