
मुंबई : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त भाजपच्या वतीने रविवार, दि. २५ मे रोजी पवई येथील गणेश विसर्जन घाटावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यानंतर घाटाचे पूजन करून राजमाता अहिल्यादेवींना आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष वीरेंद्र म्हात्रे,भाजपचे जेष्ठ नेते श्रीनिवास त्रिपाठी, कार्यक्रमाचे आयोजक तथा भाजपचे पवई मंडळ अध्यक्ष महेश चौगुले, जिल्हा उपाध्यक्ष रंजना राणे, विधानसभा महामंत्री रेश्मा चौगुले यांच्यासह सर्व वॉर्ड अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.