बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालट? युनूस राजीनामा देण्याच्या तयारीत?; म्हणाले, "काम करणं कठीण…"

    23-May-2025   
Total Views |
 
Bangladesh
  
ढाका : (Bangladesh's Interim Government Chief Muhammad Yunus Planning To Resign) बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. बांगलादेशातील अंतरिम सरकार कधीही कोसळू शकते, अशी माहिती समोर येत आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस (Muhammad Yunus)यांनी पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
 
हे वाचलंत का? -  "आता चर्चा फक्त PoK वर..."; पहलगाम हल्ल्याच्या एक महिन्यानंतर पंतप्रधान मोदींचा बिकानेरमधून पाकला थेट इशारा
 
काय म्हणाले युनूस?
 
मोहम्मद युनूस म्हणालेत की, "देशातील सध्याची परिस्थिती पाहता काम करु शकत नाही. राजकीय पक्षांसोबत काम करणे कठीण होत चालले आहे. मला ओलिस असल्यासारखे वाटत आहे." सल्लागार परिषदेच्या बैठकीत देशाच्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करताना त्यांनी हे मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर ते खरंच राजीनामा देणार का, हे पाहणं म्हत्तवाचे ठरणार आहे.
 
मोहम्मद युनूस यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरू असताना बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी अधिकाऱ्यांना यावर्षी डिसेंबरपर्यंत निवडणुका घेण्याच्या दिशेने काम करण्यास सांगितले आहे. देशाची भविष्यातील दिशा ठरवण्याबाबत निर्णय केवळ निवडून आलेले सरकारच घेऊ शकते, असे लष्करप्रमुखांनी अंतरिम सरकारला सांगितले आहे.लष्करप्रमुखांचे हे विधान मोहम्मद युनूस यांना दिलेला अल्टिमेटम समजले जात आहे. कारण निवडणुका होताच युनूस यांचा कार्यकाळ संपणार आहे.
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\