'निफ्टी वेव्हज् इंडेक्स'चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- मीडिया, मनोरंजन आणि गेमिंग क्षेत्राला नवा आयाम

    02-May-2025
Total Views |


मुंबई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हस्ते व्हर्चुअल बेल वाजवून शुक्रवार, दि. २ मे रोजी जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत (वेव्हज) 'निफ्टी वेव्हज् इंडेक्स'चा शुभारंभ करण्यात आला. ‘निफ्टी वेव्हज् इंडेक्स’च्या माध्यमातून या कंपन्यांमध्ये जगभरातील गुंतवणूक होईल. निफ्टी वेव्हज् इंडेक्स मध्ये मीडिया, मनोरंजन आणि गेमिंग क्षेत्रातील ४३ सूचीबद्ध कंपन्या समाविष्ट आहेत.

भारताच्या सर्वात गतिशील क्षेत्रांपैकी एक असलेल्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य ‘निफ्टी वेव्हव्ज’च्या माध्यमातून झाल्याचा अभिमान वाटत आहे, असा विश्वास एनएससीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी यावेळी व्यक्त केला.

'बायकॉन' कंपनी महाराष्ट्रात गुंतवणूक करणार

- औषध निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून बायकॉन लिमिटेड महाराष्ट्रात गुंतवणूक करायला उत्सुक आहे, ही स्वागतार्ह बाब असून यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वेव्हज परिषदेत बायोकॉन लिमिटेडच्या कार्यकारी अध्यक्षा किरण शॉ मुजुमदार यांच्या समवेत आयोजित भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

- यासंदर्भात राज्य शासनाचे अधिकारी बायकॉन व्यवस्थापन समितीसोबत प्राथमिक चर्चा करतील. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने बायकॉनला सर्व सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी औषध उत्पादन निर्मिती मध्ये बायकॉन गुंतवणूक करायला उत्सुक आहे. इन्सुलिन निर्मितीमध्ये लवकरच बायकॉन जगातील अव्वल कंपनी होणार आहे. या दृष्टीने बायकॉनला महाराष्ट्रात गुंतवणूक करायची असून पुणे परिसरात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यास इच्छुक असल्याचे किरण शॉ मुजुमदार यांनी सांगितले.