ज्योती मल्होत्राचे पहलगाम कनेक्शन? धक्कादायक माहिती उघड

    19-May-2025
Total Views |
 
Jyoti Malhotra
 
मुंबई : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी हरियाणाील रहिवाशी ज्योती मल्होत्राचे पहलगाम कनेक्शन पुढे आले आहे. हल्ल्यापूर्वी ज्योती पहलगाममध्ये गेली असून तिचा तिथला एक व्हिडीओ सध्या माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. त्यामुळे पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी ज्योतीचे काही कनेक्शन आहे का? याबाबतचा तपास करण्यात येत आहे.
 
ज्योती मल्होत्रा ही भारतातील एक लोकप्रिय युट्यूबर असून पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ज्योती पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी दानिशच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
 
हे वाचलंत का? -  ISI च्या निमंत्रणावरून काँग्रेस खासदाराचा पाकिस्तान दौरा! मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांचा खळबळजनक दावा
 
एवढेच नाही तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या ३ महिन्याआधी ती श्रीनगर येथे गेली होती. यादरम्यान तिने पहलगामलाही भेट दिली. यासंबंधीचा एक व्हिडीओही सध्या पुढे आला आहे. त्यामुळे पहलगाम हल्ल्याशी ज्योती मल्होत्राचा काही संबंध आहे का? या दिशेने पोलिसांकडून तपास सुरु आहे.