नक्षलवादविरोधी मोहीम गाजवणार्‍या ‘रोलो’चा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू

    17-May-2025
Total Views |
 
Rolo dog who campaigned against Naxalism dies in bee attack
 
रांची : ( Rolo dog who campaigned against Naxalism dies in bee attack ) ‘केंद्रीय राखीव पोलीस दला’च्या ‘228 बटालियन’मध्ये सेवा बजावत असलेल्या ‘के9 रोलो’ हिचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. दि. 27 एप्रिल रोजी तिला मृत घोषित करण्यात आले. ‘सीआरपीएफ’ जवानांनी शुक्रवार, दि. 16 मे रोजी रोलोला सन्मानार्थ ‘गार्ड ऑफ ऑनर’ देत तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
 
मधमाशांच्या विषारी डंखांमुळे रोलोला अ‍ॅनाफिलेक्टिक शॉक आला आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. दि. 27 एप्रिल रोजी तिला मृत घोषित केल्यानंतर शुक्रवारी ‘सीआरपीएफ’ जवानांनी रोलो मादी श्वानावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले.
 
लष्करी श्वान के9 रोलो ही केवळ दोन वर्षांची होती आणि छत्तीसगढमध्ये नक्षलविरोधी मोहिमांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. एका विशेष मोहिमेमधून परतताना जंगलात मधमाशांनी तिच्यावर आणि एका सुरक्षारक्षकावर हल्ला केला. या हल्ल्याची रोलो मादी श्वान बळी ठरली.