"पाकिस्तान दहशतवादी देश आहे हे जगाला कळण्यासाठी...!", शिष्टमंडळाच्या निर्णयावर काय म्हणाले मुख्यमंत्री?

    17-May-2025
Total Views |
 
Devendra Fadanvis
 
नागपूर : पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेरण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा जगाला सांगण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. यानिमित्ताने पाकिस्तान दहशतवादी देश आहे हे जगाला कळणार असल्याचे ते म्हणाले. शनिवार, १७ मे रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
 
भारताची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी खासदारांचे शिष्टमंडळ परदेशात जाणार आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "लोकांपर्यंत आणि विशेषत: विविध देशांपर्यंत खरी बातमी पोहोचली पाहिजे. या शिष्टमंडळाच्या निमित्ताने भारताची भूमिका आणि युद्धाचे सत्य संपूर्ण जगापर्यंत पोहोचेल आणि पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे वेगवेगळ्या देशांमध्ये प्रस्थापित होईल," असे ते म्हणाले.
 
 
जनता भेटीच्या निमित्ताने लोकांच्या तक्रारींचे निवारण!
 
ते पुढे म्हणाले की, "मी नागपूरमध्ये महिन्यातून एकदा जनता भेटीचा कार्यक्रम करतो. यानिमित्ताने लोकांच्या तक्रारी जमा होतात. केवळ तक्रारी घेऊन आम्ही थांबत नाही तर संबंधित विभागाला त्या पाठवतो आणि त्याचा पाठपुरावा करतो. लोकांना त्यांच्या तक्रारींचे निवारण करता यावे यादृष्टीने हा प्रयत्न आहे," असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.