पाकिस्तानला कर्ज म्हणजे दहशतवादाला फंडींग! अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी ट्रम्प सरकारचे कान टोचले!
16-May-2025
Total Views |
नवी दिल्ली : ( Loan to Pakistan means funding terrorism ) भारत आणि पाकिस्तान यांच्या युध्द तणावाच्या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund) पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सच्या कर्जाला हिरवा कंदील दिला होता. आता या प्रकरणी अमेरिकेचे माजी अधिकारी असलेल्या मायकल रुबिन यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला चांगलेच फटकारले आहे. एका अमेरिकन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मायकल रुबीन यांची प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली आहे.
मायकल म्हणाले, "चीनने पाठिंबा दिलेला दहशतवादी देश. त्याला एक अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्यात आले आहे. यावरुन दिसून येते की, नाणेनिधीने ट्रम्प यांच्या अडचणी किती वाढवल्या आहेत. मायकल रुबीन यांची गणना जगातील आघाडीच्या सुरक्षा सल्लागारांमध्ये केली जाते. त्यांनी केलेल्या वक्तव्याचे आता गंभीर पडसाद उमटणार आहेत. मायकल यांनी यापूर्वीही पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडला होता.
रुबीन म्हणतात की, ''अमेरिका आयएमएफला १५० अब्ज डॉलर एवढे योगदान देते. ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी एक कार्यकारी आदेश जारी केला ज्यामध्ये अमेरिका ज्या संस्थांना निधी देइल त्या सर्व संस्थांना १८० दिवसांच्या आत आढावा देण्याचे आदेश दिले होते''. परंतू मायकेल रुबीन यांच्या मतानुसार, १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त बचत करून, ट्रम्प अशा लोकांना शांत करू शकतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आता पाकिस्तानला पैसे देऊन चीनला दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.