काश्मीरमध्ये अंवतीपोरात ३ दहशतवाद्यांचा खात्मा

    15-May-2025
Total Views |
काश्मीरमध्ये अंवतीपोरात ३ दहशतवाद्यांचा खात्मा


नवी दिल्ली, जम्मू आणि काश्मीरमधील अवंतीपोरा येथील नादेर भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले, अशी माहिती भारतीय लष्कराने गुरुवारी दिली आहे.


भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने त्यांच्या अधिकृत 'एक्स' हँडलवर म्हटले आहे की, अवंतीपोरा येथील नादेर येथे सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये तीन कट्टर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे", असे 'एक्स' पोस्टमध्ये म्हटले आहे. विशेष गुप्तचर माहितीच्या आधारे, भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) यांनी गुरुवारी सकाळी अवंतीपोरा येथील जम्मू-काश्मीरच्या त्राल येथील नादेर भागात संयुक्त कारवाई सुरू केली. सैन्याने संशयास्पद हालचाली पाहिल्या आणि त्यांना आव्हान देण्यात आल्यावर दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार केला. त्यास प्रत्युत्तर म्हणून सैन्यानेही गोळीबार करून त्यांचा खात्मा केला आहे.