पाकिस्तानला पाठींबा देणं तुर्कीला महागात! भारतीयांनी 'असा' दिला दणका

    15-May-2025
Total Views |
 
turkey and azerbaijan
 
मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानला भारताने जोरदार दणका देण्यास सुरुवात केली आहे. या देशांमध्ये प्रवास करण्यासाठी बुकिंग केलेल्या भारतीय नागरिकांनी त्यांची तिकिटे रद्द करण्यास सुरुवात केली आहे.
 
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जग भारताच्या बाजूने उभे राहिले असताना तुर्कीने मात्र, पाकिस्तानला पाठिंबा दिला. तसेच पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी तुर्कीने बनवलेल्या ड्रोनचा वापर केला.
 
 
त्यामुळे भारतीय नागरिकांच्या मनात तुर्कीविषयी संताप निर्माण झाला असून आता त्यांनी या देशाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक भारतीयांनी तुर्कीला प्रवास न करण्याचा निर्णय घेतला आहे. अझरबैजयान आणि तुर्कीतील बुकींग रद्द करणाऱ्यांची संख्या २५० टक्क्यांनी वाढली आहे. तर अझरबैजयान आणि तुर्कीतील बुकींग ६० टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.