कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध नागरी केंद्रात ७ ते १० मे दरम्यान कर्करोग जनजागृती माेहिम पार
14-May-2025
Total Views | 14
कल्याण: (Cancer awareness campaign at kalyan and dombivali) राज्य सरकार आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहिम पार पडली. या मोहिमेला आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला आणि असंसर्गजन्य रोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांच्या पुढाकाराने ही मोहीम पार पडली.
खडेगोळवली, टिटवाळा, आधारवाडी, महाराष्ट्रनगर या नागरी केंद्रात ही मोहीम पार पडली. यासाठी ठाणे सिव्हिल सर्जन डॉ. कैलास पवार आणि डॉ. अशोक नांदापूरकर यांचे सहकार्य लाभले. या शिबिरामध्ये ६४८ नागरिकांची कर्करोग तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३३३ नागरिकांची मुख कर्करोग तपासणी , १९२ लाभार्थ्यांची स्तन कर्करोग तपासणी आणि १२३ लाभार्थ्यांची पॅप स्मिअर तपासणी करण्यात आली. यामध्ये सापडलेल्या संशयित रुग्णांची कर्करोगाची बायोप्सी घेण्यात आली.
कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचार त्वरित सुरू करून रुग्ण सुखरूप बरा होऊ शकतो, त्यामुळे अशा प्रकारची शिबिरे अधिक प्रमाणात आयोजित करण्यात येतील असे डॉ. पवार यांनी सांगितले .सदर कर्करोग तपासणीसाठी डॉ. दिपाली मोरे ,डॉ. सोनाली महातेकर, डॉ.सफा बर्डी, डॉ. भारती पाटील यांनी परिश्रम घेतले